नागपूर: नागपूरमधील ताजबागमधील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथील ऊर्सला देशातीलच नव्हे तर विदेशातील सर्वधर्मिय नागरिक येतात. यंदा १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ऊर्सचे हे १०१ वे वर्ष असून यंदा १६ लाख श्रध्दाळू यात सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 उर्सच्या नियोजनाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवार बैठक घेतली. त्याला आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान उपस्थित होते. उर्ससाठी १५ लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील रस्ते मोकळे करावे, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, सुरळीत वीजपुरवठा, वाहनतळाची सोय करावी, पोलीस सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, अशा सूचना गडकरी यांनी प्रशासनाला व ट्रस्टला  दिल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur famous urs 101st year this year hazrat baba tajuddin dargah in taj bagh cwb 76 ysh