नागपूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे खोपडे यांची फसवणूक झाली असून या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण कडू (२२) रा. पालघर, तालुका मोकाळा, असे आरापीचे नाव आहे.

२६ एप्रिलच्या रात्री खोपडे हे त्यांचे सहकारी अरुण हारोडे (५०) यांच्यासह दुरंतो रेल्वेने मुंबईला जात होते. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर प्रवीणचा फोन आला. त्याने आपले नाव व पत्ता सांगून कुटुंबासह प्रवासादरम्यान त्याच्या वाहनाला ठाणे येथे अपघात झाल्याची माहिती दिली. तसेच या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रुग्णवाहिकाही मिळत नाही व नागपूरला परतण्यासाठी डिझलचे पैसेही नसल्याची बतावणी करीत ६ हजार रुपयांची मागणी केली. आमदार खोपडे यांनी तत्काळ सहकारी हारोडे यांना आरोपी प्रवीणच्या खात्यात ६ हजार रुपये वळते करण्यास सांगितले. अरुण यांनी पैसे वळते केले.

Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
baba siddique murder case
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: जुहू बीचवर काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे आरोपी अडकले; तिसऱ्या फरार साथीदाराचीही ओळख पटली!
no action against officer found guilty in cow distribution scam
बहुचर्चित गायवाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई नाहीच; लाभार्थी, कर्मचाऱ्यांचे पुन्हा जबाब…
after akshay shinde case thane Crime Investigation Branch post of chief become difficult
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची खबऱ्यांवर भिस्त, पोलीस आयुक्तालयात बैठक
Israel air strike on gaza news in marathi
Israel Attack on Hamas : हमास सरकारमधील तीन दहशतवाद्यांचा खात्मा, इस्रायलचा दावा; लष्कराने फोटोंसहित दिली माहिती!
police registered case for threat call of planted bomb in haji ali dargah office
हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?

हेही वाचा – जाहिरातीचा तपशील बघायचा असल्यास शुल्क द्या, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय म्हणते…

हेही वाचा – विदर्भातील गावरान आंबा झालाय दुर्मिळ, लोणच्यासाठी भिस्त ‘या’ राज्यावर

नागपूरला परतल्यावर हारोडे यांनी घटनेबाबत विचारपूस केली असता अशी कुठलीच घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्याच मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता प्रवीणने ५ हजार रुपये ऑनलाईन परत केले. मात्र उर्वरित एक हजार रुपये देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे हारोडे यांनी पाच दिवसांपूर्वी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.