नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधील एका प्लास्टिक दुकानाला रविवारी सकाळी आग लागली असून यात संपूर्ण दुकान खाक झाले. सकाळी आठच्या सुमारास ही आग लागल्याने या भागात खळबळ उडाली. दुकानातूनमोठा धूर निघत होता. त्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडू लागले. आजूबाजूलाही दुकाने होती. त्यांनाही आगीची झळ पोहोचली. हा संपूर्ण भाग बाजारपेठेचा आहे.आज रविवार असल्याने व सकाळची वेळ असल्याने दकाने बंद होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या च्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आग विझविण्यात यश आले. आग पसरली असती मोठी घटना घडली असती.

Story img Loader