नागपूर : नागपुरात अत्याधुनिक इलेक्ट्रिक वातानुकुलीत पहिल्या डबल डेकर बसचे लोकार्पण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे ही बस आजपासून (१६ सप्टेंबर) ज्येष्ठांना नि:शुल्क धार्मिक स्थळ दर्शन घडवणार आहे. या बसमध्ये ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी भजन- किर्तनचेही संगित वाजणार आहे.

नितीन गडकरींच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि अशोक ले-लँड व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार बसची आसण क्षमता ६५ आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे, अशोक ले- लँड लिमिटेडचे उपाध्यक्ष यश सच्चर, स्विच मोबिलिटीचे सीईओ महेशबाबू, तसेच लोकप्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते. अशोक ले-लँडच्या सामाजिक दायित्व निधीतून ही बस उपलब्ध करून देण्यात आली असून या बसचा ज्येष्ठ नागरिकांना विशेष फायदा होणार आहे.

हेही वाचा – आमदार अपात्रतेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी संदर्भ दिलेले ‘शेड्यूल १०’ काय आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – “बोलून मोकळे व्हायचे…” रोहित पवार असे का म्हणाले? वाचा…

प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या निःशुल्क धार्मिक स्थळ तसेच पर्यटनस्थळांच्या सहलींसाठी या डबल डेकर ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे. सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानकडे सहल आदी उपक्रमांसाठी एक ग्रीन बस असून ही बस मागील पाच वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत आहे. या बसच्या माध्यमातून शेगाव, माहूर, कळंब, आंभोरा, आदासा, धापेवाडा आदी धार्मिक स्थळांच्या निःशुल्क सहलीचा लाभ हजारो ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आहे. सध्या या बसला तीन महिन्यांची प्रतिक्षा यादी आहे. या नवीन बसने ही यादी कमी होण्याची आशा गडकरींनी वर्तवली. सोबत लवकरच आणखी तीन बस ज्येष्ठ आणि अपंगांनाही नि:शुल्क सेवा देण्यासाठी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader