नागपूर : कुही वनक्षेत्रात एक, दोन नाही तर तब्बल ५२५ पक्ष्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच शिकाऱ्यांना नागपूर वनखात्याने अटक केली. वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कुही वनक्षेत्रातील वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना खोबना वनक्षेत्राअंतर्गत मौजा अंबाडी सावळी येथील शेतशिवरात काही अज्ञात इसम पक्ष्यांची शिकार करण्यासाठी आले आहे, अशी माहिती मिळाली. कर्मचाऱ्यांनी सापळा रचून क्रिष्णा चाचेरकर, शेकर चाचेरकर, रवी चाचेरकर, सुनील चाचेरकर व आकाश चाचेरकर या कामठी येथील शिकाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून नायलॉन जाळे, नायलॉन दोरी व त्यांनी शिकार केलेले ५२५ पक्षी हस्तगत करण्यात आले.
हेही वाचा – सहाय्यक पोलीस निरीक्षक शृंगी घुबडाच्या प्रेमात
ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा व सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पी.डी. बाभळे, क्षेत्र सहाय्यक एस.यू. चव्हाण, आर.डब्ल्यू. पिल्लेवार, वनरक्षक जी.एस. सहारे, पी.बी. दहीकर, पी.एम. चोपडे, पी.जी. गराडे, वनमजूर कैलास तितरमारे, सुरेश तिरमारे, कृष्णा शहारे, राजू मोंडे, ब्रम्हा आस्वले, वासुदेव ठाकरे यांनी केली.