शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या आठवड्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल चार निवासी डॉक्टरांना चावा घेतला. रविवारी दोन डॉक्टरांना चावा घेतल्यावरही महापालिकेचे अधिकारी कुत्र्यांचा बंदोबस्त करत नसल्याने मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली.
रविवारी एक महिला निवासी डॉक्टर परिसरात कामानिमित्त जात असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांना याबाबत माहिती देण्यात आली.
इंजेक्शन, औषधांचाही तुटवडा –
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतलेले बरेच रुग्ण उपचाराला येतात. परंतु, येथे औषधांचा तुटवडा असल्याने ते रुग्णांना बाहेरून आणाण्यास सांगितले जात आहे. कुत्र्यांनी डॉक्टरांना चावा घेतल्याच्या घटनांनंतर या इंजेक्शन आणि औषधांचा तुटवडा असल्याचेही पुढे आले.