नागपूर: नागपूरसह देशभरात मध्यंतरी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७५ हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर हे दर ७१ हजाराच्या जवळपास खाली आले. तर त्यानंतर पून्हा हे दर ७२ हजाराच्या जवळपास कमी- अधिक खाली- वर होताना दिसत आहे. सोन्याचे दर स्थिर होत नसल्याने दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरसह राज्यातील अनेक भागात आताही विवाह सोहळे सुरू आहेत. या समारंभात वर- वधूला सोन्याचे दागिने घेतले जातात. त्यामुळे हल्ली नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान सोन्याचे दर घसरल्याने या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात १९ जूनला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ९००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८८ हजार ९०० रुपये होता.

हेही वाचा – नागपुरातील हिट अँड रन प्रकरणात हलगर्जीपणा, ठाणेदार तडकाफडकी निलंबित

दरम्यान १० जूनला हे दर २४ कॅरेटसाठी ७१ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ३०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होता. २७ मे रोजी २४ कॅरेटसाठी ७२ हजार ४००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९० हजार १०० रुपये होता. हे दर २० मे २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी ७५ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ९०० रुपये अशा विक्रमी उंचीवर होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ७०० रुपये होता. त्यामुळे या तारखेनंतर सातत्याने नागपुरात सोन्याचे दर घसरलेले दिसत आहे.

हेही वाचा – सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वित्त विभागाचा अन्याय, मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही…

सराफा व्यावसायिक म्हणतात सध्या गुंतवणूक फायद्याची

नागपूरसह देशात करोनानंतर सातत्याने सोने- चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सोन्याचे दर जास्तच वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांतील सोन्याच्या दरातील वाढ बघता सराफा व्यावसायिकांकडून या धातूमध्ये गुंतवणूक फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur frequent changes in gold rates these are todays rates mnb 82 ssb
Show comments