भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या घटनेचे वृत्त दैनिक लोकसत्तामध्ये प्रकाशित झाल्यावर त्याची दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बातमीचे कात्रण ट्विट करीत ही अत्यंत खेदजनक घटना असल्याचे नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांनी पीडिताच्या कुटुंबीयांसोबत दूरध्वनीवर संपर्क साधून धीर दिला तसेच न्यायासाठी सर्वोतोपरी कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी संपर्क साधला व पीडितेवरील उपचाराची माहिती घेतली. तसेच भडाऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याशीही संपर्क साधून माहिती घेतली. याशिवाय या घटनेचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडे केली. पीडितेला समुपदेशन तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसनासाठी प्रयत्न करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.