नागपूर: सोन्याच्या दरात चढ- उताराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (२३ डिसेंबर २०२४) वाढ झाली होती. मात्र मंगळवारी (२४ डिसेंबर २०२४) मात्र २४ तासातच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. परंतु चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये मात्र चिंता वाढली आहे. हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नामध्ये वर- वधूला मोठ्या प्रमाणात सोन्याची साखळी, मंगळसूत्रासह इतरही दागिने भेट देणे अथवा स्वत:साठी बनवून घेतले जातात. त्यासाठी सगळ्याच सराफा दुकानात ग्राहकांची गर्दी होते. दरम्यान सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र होते. मात्र मंगळवारी २४ तासात सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

नागपुरात २३ डिसेंबरला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ७०० रुपये होते. या दरात चोवीस तासानंतर २४ डिसेंबर २०२४ रोजी सराफा बाजार उघडल्यावर घट झाली. हे दर मंगळवारी (२४ डिसेंबर २०२४) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७६ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे २३ डिसेंबर २०२४ रोजीच्या तुलनेत २४ डिसेंबर २०२४ रोजी नागपुरात सोन्याच्या दरात घट झालेली बघायला मिळत आहे. हे दर २४ कॅरेटमध्ये २०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १०० रुपये, १८ कॅरेटमध्ये २०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १०० रुपये प्रति दहा ग्रामने कमी झालेले दिसत आहे. सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली असली तरी येत्या काढात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीतील गुंतवणूक आताच्या काळात लाभदायक असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

Sunil Yadav assassination
Lawrence Bishnoi Gang : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादवची हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Ladki Bahin Yojana
Maharashtra News LIVE Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Tipeshwar Wildlife Sanctuary yavatmal
टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!

हेही वाचा : टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर

चांदीच्या दरात वाढ

नागपुरातील सराफा बाजारात २३ डिसेंबरला सकाळी बाजार उघडल्यावर १०.३० वाजता चांदीचे दर ८८ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. हे दर २४ डिसेंबरला दुपारी ८८ हजार ७०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे २३ डिसेंबरच्या तुलनेत नागपुरात २४ डिसेंबरला चांदीच्या दरात २०० रुपये प्रति किलो वाढ नोंदवली गेली आहे.

Story img Loader