नागपूर: केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठी कपात केल्यानंतर नागपूरसह देशभरात सोने- चांदीचे दर घसरले. परंतु आता पुन्हा सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे. मंगळवारी ३० जुलैला दुपारी नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ६९ हजार रुपयाहून अधिक होते. त्यामुळे दागिने खरेदीस इच्छुकांची चिंता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह राज्यातील काही भागात आता लग्न, साक्षगंधाच्या कार्यक्रमाची संख्या कमी झाली. परंतु काही प्रमाणात या कार्यक्रमांसह वाढदिवस, बारसे व इतर बऱ्याच कार्यक्रमाची रेलचेल आहे. या कार्यक्रमात बऱ्याच कुटुंबात सोने- चांदीचे दागिने भेट म्हणून दिले जातात. त्यामुळे आजही सराफा बाजारात ग्राहकांची रेल- चेल बघायला मिळत आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात मंगळवारी (३० जुलै)च्या दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार रुपये नोंदवण्यात आले. हे दर सोमवारी (२९ जुलै) बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ४०० रुपये होते. त्यामुळे आता सोन्याच्या दरात वाढ होतांना दिसत आहे.

हेही वाचा : वाघ आला रे आला! त्या दोघांनी मोठ्या हिंमतीने वाघाला लावले पळवून अन्…

दरम्यान सोन्याचे दर अर्थसंकल्पापूर्वीच्या दिवशी सोमवारी (२२ जुलैला) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७३ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६८ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर अर्थसंकल्प असलेल्या दिवशी अर्थसंकल्प जाहिर झाल्यावर सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली. या दिवशी (२३ जुलै) संध्याकाळी नागपुरातील सराफा बाजार बंद होतांना २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले. दरम्यान हल्ली काही प्रमाणात सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत असली तरी लवकरच सोन्याचे दर वाढण्याची शक्यता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या सोन्यात ग्राहकांसाठी गुंतवणीकीची चांगली संधी असल्याचे या व्यवसायिकांचे म्हणने आहे.

हेही वाचा : कौशल्यविकासाच्या माध्यमातून वर्षाकाठी ६० हजारांचे उत्पन्न; गडचिरोलीच्या आदिवासी तरुणांची यशोगाथा…

प्लॅटिनम आणि चांदीचे दर

नागपुरात प्लॅटिनमचे दर मंगळवारी प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये होते. हे दर अर्थसंकल्पापूर्वी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम होते. दरम्यान नागपुरात मंगळवारी (३० जुलै) चांदीचे दर प्रति किलो ८२ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. हे दर २९ जुलैच्या दुपारी ८३ हजार १०० रुपये प्रति किलो होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur gold price today mnb 82 css