नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात रॅगिंगची तक्रार थेट अधिष्ठात्यांच्या ई-मेलवर करण्यात आली. प्रशासनाने चौकशी केल्यावर सगळ्याच विद्यार्थ्यांनी काहीही झाले नसल्याचे लेखी दिले. त्यामुळे एक-एक विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. शुक्रवारी ॲन्टी रॅगिंग समितीची बैठक घेतली गेली. यावेळीही सगळ्या विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात रॅगिंग झाले नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना दोषीचे नाव सांगण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यावरही ते असे काही झाले नसल्यावर ठाम राहिले. त्यानंतर तीन सदस्यीय समितीकडून चौकशी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “अजित पवार हे नक्कीच मुख्यमंत्री होणार,” माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे विधान

त्यातही प्रथमदर्शनी रॅगिंग झाली नसल्याचे पुढे आले. त्यामुळे आता हा अहवाल तयार करून संबंधित विभागांना पाठवला जाणार आहे. “सदर प्रकरणात विविध स्तरावर चौकशी केली गेली. त्यात रॅगिंग झाली नसल्याचे पुढे आले आहे. प्रशासनाकडून येथील प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे येथे हा प्रकार घडणे शक्य नाही.” असे दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur government dental college and hospital dean received complaint about ragging of first year girls mnb 82 css
Show comments