ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला नागरिकांना बघण्यासाठी १४ आणि १५ ऑगस्टला खुला करण्यात येत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पर्यटकांना किल्ला बघता येणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहेत. त्या निमित्ताने देशात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा १४ ऑगस्ट फाळणी दिवस किंवा अखंड भारत दिवस म्हणून देखील साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने नागपुरातील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला १४ आणि १५ ऑगस्टला पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

परंतु, सीताबर्डी किल्ला बघावयास येणाऱ्यांना वाहने कुठे उभी करायची ही समस्या मात्र कायम आहे. सीताबर्डी किल्ला परिसरात वाहनतळाची व्यवस्था नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते.

Story img Loader