लोकसत्ता टीम
यवतमाळ: नागपूर – हैदराबाद मार्ग शनिवारी रात्रीपासून बंद झाला आहे. पैनगंगा नदीला पूर असल्याने पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी गावाजवळ पिंपळखुटी चेकपोस्ट नजीक वाहतूक थांबविण्यात आली आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्थानिकांनी प्रवाशांसाठी चहा, नास्ता व्यवस्था केली आहे.
आणखी वाचा-वर्धा: स्तनांचे सौंदर्यीकरण साधणारी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
दरम्यान जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतली आहे. आज ढगाळ वातावरण आहे. पाऊस नाही. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातील पूर ओसरत असून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री संजय राठोड पहाटेच यवतमाळ येथे पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूर परिस्थितीची आढावा बैठक सुरू आहे. बैठकीनंतर दोन्ही मंत्री यवतमाळसह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात पाहणी करणार आहेत.