घरगुती सिलिंडरमधील ‘एलपीजी’ अवैधरित्या चारचाकी वाहनांमध्ये वापरण्याचा प्रकार नागपूर शहरात सर्रासपणे सुरू असून याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. यामुळे अपघात होऊन प्राणहानी होण्याची भीती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरपेक्षा (१४.२ किलो) व्यावसायिक सिलिंडर महाग आहे. किमतीत सुमारे एक हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर चारचाकी वाहनात केला जात आहे. शहरात अवैध गॅस भरणारे अनेक केंद्र आहेत. पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई देखील केली आहे. गेल्या दोन महिन्यात नागपुरात ५७ एलपीजी सिलिंडर आणि मशीन पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पण, या केंद्रांवर मोठ्या संख्येत घरगुती गॅस सिलिंडर नेमके येतात कोठून याचा शोध अजून लागलेला नाही.

शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान –

काही ठिकाणी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरमधील गॅस भरला जातो. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. यामुळे प्राणहानीचा धोका उद्भवतो. सोबतच शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

तेल कंपनीचे अधिकारी आणि सिलिंडर वितरकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही –

“घरगुती वापराचे सिलिंडर व्यावसायिक कामासाठी उपलब्ध होणे, चारचाकी वाहनांसाठी मिळणे सहज शक्य नाही. तेल कंपनीचे अधिकारी आणि सिलिंडर वितरक यांच्या सहभागाशिवाय हे होणे शक्य नाही.” असा आरोप कौन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राइट्स ग्राहक भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तिवारी यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur illegal use of cylinders in vehicles msr