नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी गावात रमी क्लब, सोशल क्लबच्या नावाखाली चक्क जुगार अड्डे सुरु आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणासह अन्य राज्यातील मोठमोठे व्यावसायिक येथे जुगार खेळण्यासाठी येतात. एका राजकीय नेत्याने सोशल क्लबच्या नावावर चक्क घरात जुगार अड्डा सुरु केला असून त्याने पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटक आणि तेलंगणा राज्याने ‘सोशल क्लब’वर बंदी घातली. त्यामुळे या राज्यातील मोठमोठे व्यावसायिक जुगार खेळण्यासाठी राज्याच्या सीमेलगत गावाचा आधार घेत आहेत. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद मार्गावर पाटणबोरी या गावात एका राजकीय नेत्याने रमी क्लब, सोशल क्लबच्या नावाखाली चक्क स्वतःच्या घरात जुगार अड्डा सुरु केला. तेथे आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा यासह अन्य राज्यातील व्यावसायिक जुगार खेळण्यासाठी येत आहे. एका राजकीय पक्षाच्या नेत्याने यवतमाळ पोलिसांशी संगनमत केले असल्यामुळे आतापर्यंत एकदाही येथे पोलिसांचा छापा पडला नाही. त्यांच्या आशीर्वादानेच येथे बिनधास्तपणे जुगारअड्डे सुरु आहेत. लक्षाधिश असलेले व्यावसायिक ‘जॉकपॉट’ लागेल या आशेने जुगार खेळायला येतात. सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत सुरु असलेल्या अड्ड्यावर सर्व सुविधा संचालक उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे विदेशी मद्याच्या बाटल्यांचा खच सकाळी या क्लबबाहेर पडलेलो दिसतो.स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरु आहे. या जुगार अड्ड्यावर लाखो रुपयांची उलाढाल एका रात्रीतून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा…प्रियकराला भेटायला आलेल्या अल्पवयीन प्रेयसीची ‘अधुरी प्रेम कहाणी’

हवाल्यातील पैसा जुगारात !

अवैध मार्गाने कमविलेला पैसा जुगार खेळण्यासाठी वापरला जातो. अन्य राज्यातील व्यापारी रमी क्लबचे सदस्यत्व असल्याचे दाखवून जुगार अड्डा भरविल्या जात असल्याची माहिती आहे.

पाटणबोरीत जर अशा प्रकारचा कोणत्याही सोशल क्लबमध्ये जुगार भरविल्या जात असेल तर त्यावर छापा घालून कारवाई करण्यात येईल. कोणतेही अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाही.
कुमार चिंथा (पोलीस अधीक्षक, यवतमाळ) अधीक्षक, यवतमाळ

Story img Loader