यवतमाळ : जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात ७७ उमदेवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १०२ उमेदवार आहेत. यवतमाळ, पुसद, आर्णी येथील महाविकास आघाडी आणि महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. मात्र वणी व उमरखेड येथे बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आले.

यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, आर्णी, राळेगाव व वणी या सात मतदारसंघात १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी यापैकी ७७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यवतमाळ मतदारसंघात १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता २२ उमदेवार रिंगणात आहेत. वणी मतदारसंघात चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. येथे आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. राळेगावमध्ये सात जणांनी माघार घेतल्याने ११ जण निवडणूक लढवित आहेत. दिग्रसमध्ये चार जणांनी माघार घेतली. येथे १३ उमेदवार रिंगणात आहेत. आर्णीमध्ये सात उमदेवारांनी माघार घेतल्याने १४ उमेदवारांमध्ये लढत होईल. पुसदमध्ये १७ उमेदवारांनी माघार घेतली तर १३ उमेदवार रिंगणात आहेत. उमरखेडमध्ये २५ जणांनी माघार घेतल्याने १७ उमदेवार रिंगणात आहेत. सर्वाधिक २२ उमेदवार यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहे. सर्वांत कमी ११ उमेदवार राळेगावमधून लढत आहेत.

Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

हेही वाचा…अमरावती जिल्हयात अनेकांच्‍या तलवारी म्‍यान…पण, सात बंडखोर मात्र…

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला जावा या हेतूने उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. मात्र यवतमाळात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुसदमध्ये नाईक कुटुंबात वाद निर्माण झाल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्याविरोधात अपक्ष उमदेवारी दाखल करणारे त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी माघार घेतली. त्यामुळे नाईक कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आर्णी मतदारसंघात भाजपचे राजू तोडसाम यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. विष्णू उकंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यांनतर डॉ. उकंडे यांनी माघार घेतली. यामुळे यवतमाळात महाविकास आघाडीला तर पुसद व आर्णीमध्ये महायुतीच्या उमदेवाराला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा…‘भाजप’कडून फराळ वाटप नियमात, मात्र संविधान जागर नियमबाह्य.. हा कोणता कायदा?

वणी व उमरखेड मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीला बंडखोरांची समजूत घालण्यात अपयश आले. वणी येथे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठकारे गटाचे संजय देरकर रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अनेकांनी समजूत घालूनही त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने वणीत महाविकास आघाडीतील दुफळी भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. उमरखेडमध्ये महाविकास आघाडीने काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार विजय खडसे यांनी अपक्ष उमदेवारी दाखल केली. खडसे यांनीही काँग्रेस नेत्यांना न जुमानता उमदेवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली. येथे भाजपचे माजी आमदार राजेंद्र नजरधने हे मनसेकडून निवडणूक लढवत असल्याने महायुतीचीही अडचण झाली आहे.

Story img Loader