केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी आज (बुधवार) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नागपुरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नेत्यांच्या घरीही गणपतीची प्रतिष्ठापना होते.
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. आज त्यांचे पुत्र सारंग यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडकरी दिल्लीत असल्याने यावेळी अनुपस्थित होते. मात्र कांचन गडकरी यांच्यासह सर्व गडकरी कुटुंबीय यावेळी हजर होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी गणपतीची विधिवत पुजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी त्यांच्या कुटुंबीय उपस्थित होते.