नागपूर : हॉटेलमध्ये मैत्रिणीसह जेवण करीत असलेल्या राष्ट्रीय तपास एजन्सीमध्ये (एनआयए) कार्यरत आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्या तिघांना सदर पोलिसांनी अटक केली. त्यांनी महिलेकडे बघून अश्लील इशारे केल्यानंतर घरापर्यंत पाठलाग केला होता. राजेश कुमार तलरेजा, सूरज कुन्हाडकर आणि मनोज छाबरा (रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.

एका आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी तीन मैत्रिणींसह गेल्या २२ एप्रिलला सदरमधील अशोका हॉटेलमध्ये जेवण करायला गेली होती. तिचा पती एनआयएमध्ये कार्यरत आहे. त्या महिलांच्या बाजुच्या टेबलवर आरोपी राजेश कुमार तलरेजा, सूरज कुन्हाडकर आणि मनोज छाबरा हे जेवण करीत होते. या दरम्यान, तिघांनीही त्या महिलांकडे बघून अश्लील इशारे करणे सुरु केले. महिलांनी त्यांच्याकडे बघून दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यापैकी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा तिघांनी कारने पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्या घराजवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
Image of a related graphic, a photo representing the incident, or a picture of a pride flag
Same Sex Marriage : वहिनीशी लग्न करण्यासाठी तरुणीचा हट्ट, कुटुंबीयांनी नकार देताच प्यायली विष
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी

हेही वाचा – युवक काँग्रेसमध्ये कारणे दाखवा नोटीसमुळे वादळ, कुणाल राऊत लक्ष्य

हेही वाचा – उज्ज्वल निकम देशद्रोही! वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले, “दहशतवादी कसाबबद्दल…”

पोलीस अधिकारी पतीने पत्नीसह सदर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तीनही आरोपींना अटक केली. आरोपी राजेश कुमार तलरेजा हा हॉटेल व्यावसायिक आहे. तर मनोज छाबरा हा फायफान्स कंपनीचा संचालक आहे. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती त्यांना नव्हती. राजेश कुमार तलरेजाचे आईवडील आणि भाऊ पाकिस्तानात राहतात. त्याचा भाऊ पाकिस्तानात संत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Story img Loader