नागपूर : आयटी पार्क ते माटे चौकापर्यंत अवैधरित्या रस्त्यावर लावलेल्या खाद्यपदार्थ दुकानदारांकडून पोलीस आणि महापालिकेचे पथक हप्ते घेत आहेत. त्यातून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होत असून त्याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी परीसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.

अंबाझरी तलावाच्या रस्त्यावरील पूल सुरु झाल्यानंतर माटे चौक ते आयटी पार्क चौकातील रहदारी वाढली आहे. तसेच त्या रस्त्यावरुन वाहनांची संख्याही वाढली आहे. माटे चौक ते आयटी पार्क चौक जवळपास दीडशेवर खाद्यपदार्थाची दुकाने अवैधरित्या पदपथावर लागली आहेत. त्या दुकानदारांनी खुर्च्या आणि टेबलसुद्धा रस्त्याच्या कडेला मांडले आहेत. तसेच दुकानावर येणाऱ्या ग्राहकांच्या चारचाकी आणि दुचाकीसुद्धा दुकानासमोर ऐटीत लावण्यात येतात. त्यामुळे या रस्त्यावर सायंकाळ ते रात्री १० पर्यंत वाहन कोंडी होत आहे. वाहनकोंडी, परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होऊनही गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील अतिक्रमन वाढत आहे. सोनेगाव वाहतूक पोलीस, बजाजनगर पोलीस, प्रतापनगर पोलीस आणि महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक यांच्या ‘अर्थपूर्ण’ आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. यामागे पोलीस आणि महापालिकेच्या पथकाची हप्तेखोरी प्रमुख कारण असल्याचे उघड झाले आहे. तरीही खाद्यपदार्थ विक्रेते त्यांच्या जागेवर कायम आहेत आणि नागरिकांनाही त्रास कायम आहे. पोलीस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी डोळे बंद करुन बसले आहेत, यामागे ‘अर्थपूर्ण’ संबंध हेच प्रमुख कारण असल्याचे बोलल्या जाते.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Chota Matka a tiger from the Tadoba Andhari Tiger Project gave a glimpse to the tourists
ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
police
प्रेमीयुगुलांकडून वसूली करणाऱ्या पोलिसांवरील गुन्हा रद्द, कारण काय? जाणून घ्या…
Nagpur - Pune travel fare, Nagpur - Pune,
नागपूर – पुणे प्रवास भाडे पाच हजारांवर, प्रवाशांची लूट अन् आरटीओ झोपी

हेही वाचा – भाजपचे अखेर ठरले, पश्चिम- सुधाकर कोहळे, उमरेडमधून सुधीर पारवे लढणार

अतिक्रमन काढण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

दिवाळीनिमित्त शहरात खरेदीची लगबग सुरु आहे. त्यामुळे रस्ते गजबजलेले आहेत. आयटीपार्क-माटे चौक हा प्रमुख रस्ता आहे. मात्र, त्याच रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी असते. या कोंडीत अनेक जण अडकत असल्यामुळे वाहनचालकांनामध्येसुद्धा नाराजीचा सूर आहे. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याकडे पोलीस आणि महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – ‘हयांना जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा’…..व्हिडीओतील उपरोधाच्या बाणांनी महायुतीवर…

आयटी पार्क ते माटे चौक या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांची नियमित कारवाई सुरु आहे. परंतु, आता महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकांच्या मदतीने संयुक्तरित्या कारवाई करणार आहोत. हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाण सुरळीत होईल. – सुहास घोडके (पोलीस निरीक्षक, सोनेगाव वाहतूक शाखा)