नागपूर : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची सर्वात मोठी तूट होती. ५८ टक्के कमी पाऊस या महिन्यात झाला. तब्बल १०२ वर्षानंतर सर्वाधिक कमी पाऊस या महिन्यात झाला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पावसाची तूट केवळ सात टक्के होती. राज्यात पावसाची सरासरी ७४१.१० मिमी आहे. आतापर्यंत ६९२.७० मिलीमिटर पाऊस झाला आहे. राज्यात तीन, चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आता कमी होऊ लागला आहे.
हेही वाचा : ‘कॅन्सर’ झाला की नाही हे पहिल्याच टप्प्यात सांगणाऱ्या यंत्राचा शोध, वाचा कॅन्सरला कसे हरवता येणार
मान्सून कमकुवत झाल्याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. मात्र, राज्यात लवकरच मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात मान्सून कमकुवत होता. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस परतला. त्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला. परंतु आता सोमवारपासून मान्सून कमकुवत झाला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कुठेही मुसळधार पाऊस पडणार नाही. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर असणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.