नागपूर : शहरातील विकासकामांचा फटका ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला बसला आणि येथील प्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आली. ज्या महापालिका हद्दीतील विकासकामामुळे या प्राणिसंग्रहालयाची सुरक्षा भिंत कोसळली, त्या महापालिका प्रशासनाची भिंत उभारऊन देण्याची जबाबदारी होती, पण विकासकामांपुढे त्यांना प्राण्यांच्या सुरक्षिततेचा विसर पडला. शेवटी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने जैविक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या पश्चिम दिशेच्या बाजूस २०० बांबूंचे वृक्षारोपण करण्यात आले. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दिलेल्या अटींनुसार, प्राणीसंग्रहालयाच्या चारही बाजूने सुरक्षा भिंत आवश्यक आहे, पण विकास कामांनी या सुरक्षा भिंतीचा बळी घेतला. रस्त्याच्या रुंदीकरणात, जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने भिंत उभारणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या पश्चिम बाजूला जैविक भिंत तयार करण्यासाठी २०० बांबूंचे वृक्षारोपण करण्यात आले.

हेही वाचा – पश्चिम विदर्भात पक्षाच्या पुनर्बांधणीचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न

सदर वृक्षारोपण प्राणिसंग्रहालय नियंत्रक तथा सहयोग अधिष्ठाता कृषी महाविद्यालय नागपूर येथील डॉक्टर प्रकाश कडू यांच्या हस्ते करण्यात आले. प्राणी संग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सु. श्री. बावस्कर, डॉ. राजेंद्र काटकर, डॉक्टर विजय एल्लोरकर, डॉ. मिलिंद राठोड, विलास तेलगोटे, डॉ. अभिजीत मोटघरे, महेश पांडे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur maharaj bagh zoo hit by development works rgc 76 ssb