नागपूर : बँक खात्यातून २० कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाल्याची बतावणी करून तोतया सायबर पोलिसाने एका व्यक्तीला १३.१६ लाख रुपयांनी गंडा घातला. या प्रकरणी सदर पोलिसांनी एनॉन मथ्थुशील प्यारेजी (३९) रा. न्यू कॉलनीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
एनॉन हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात आणि आईसोबत न्यू कॉलनीत राहतात. १८ ऑगस्टच्या सायंकाळी त्यांना व्हॉट्सअॅपवर ऑडिओ कॉल आला.

फोन करणाऱ्याने सायबर गुन्हे विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करून जे बोलतो ते लक्षपूर्वक ऐकण्यास सांगितले. ‘तुमच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून २० कोटी रुपयांचा गैरकायदेशीर व्यवहार झाला आहे. या प्रकरणाची गोपनीय चौकशी सायबर गुन्हे विभाग, मुंबईकडून केली जात आहे. या प्रकरणात तुम्हाला अटक होऊन तुरुंगात जावे लागेल,’ असे सांगितले.

cyber crime rising and engineers students and educated citizens becoming victim
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
foreign liquor worth Rs 6 lakh seized from tempo on wada shahapur road
वाडा-शहापूर मार्गावर टेम्पोच्या चोरकप्प्यातून सहा लाखाचा विदेशी मद्य साठा जप्त
Classification of funds Rs 80 crore earmarked for construction of drainage lines and sewage treatment plants
आयुक्तांनी फिरविला शब्द, ८० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
scam of 65 lakhs has been made by keeping entire family in digital arrest in Nagpur
नागपूर : खळबळजनक! संपूर्ण कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये, तब्बल ६५ लाख…
maharashtra lost over rs 1085 crore to cyber scams in last three month
तीन महिन्यांत १०८५ कोटींची सायबर फसवणूक
Digital arrest scammer
शेअर मार्केटमधून ५० लाखांचे ११ कोटी कमावले; डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये सगळे गमावले

हेही वाचा…नागपूर : गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुण-तरुणी धुंद! ‘त्या’ पबला राजकीय वरदहस्त

एनॉन यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती घेतो, असे म्हटले असता आरोपीने असे केले तर प्रकरण आणखी बिघडू शकते, असे म्हणून त्यांना घाबरवले. तो म्हणाला की, याबाबत कोणाला काहीही सांगू नका. सर्व प्रकरण तो त्याच्या स्तरावरच निपटवून देईल. त्यानंतर त्याने एनॉन यांच्या एसबीआय खात्यात किती पैसे आहेत याबाबत विचारले. एनॉन यांनी त्या खात्यात अधिक पैसे नसल्याची माहिती दिली. आरोपीने कसेही करून ५० हजार रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले.

आईकडून घेतले ५० हजार

एनॉन यांनी आईकडून ५० हजार रुपये घेत खात्यात जमा केले. त्यानंतर आरेापीने त्यांना स्काईप अॅप, योनो एसबीआय अॅप आणि योनो लाईट अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांचे पासवर्ड एनॉन यांच्या लक्षात नव्हते. आरोपीने त्यांना एक पासवर्ड दिला. तो पासवर्ड टाकताच लॉगीन झाले. आरोपींनी १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान एनॉन यांच्याकडून ओटीपी घेत १६ ट्रांजेक्शन केले. इतकेच नाही तर त्यांच्या आईचे एफडी खाते तोडून १३.१६ लाख रुपयेही स्वत:च्या खात्यात वळते करून घेतले. फसवणूक झाल्याचे समजताच एनॉन यांनी सदर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला.

हेही वाचा…‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…

सतर्क राहण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून खात्यातून गैरव्यवहार किंवा दहशवाद्यांशी संबंध असल्याचे सांगून घाबरवतात. गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देतात. मात्र, असा कुणाचा फोन आल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. थेट नागपूर सायबर पोलिसांशी संपर्क करा. न केलेल्या गुन्ह्यासाठी घाबरू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.

Story img Loader