नागपूर : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) बुधवारी मंगळवारी रात्री प्रसिद्ध केला. त्यात ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले असून राज्यातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वर्धा: डॉ.श्याम भुतडा व मनिष देशमुख यांना हर्बल औषधीसाठी पेटंट

९९.९९ पर्सेंटाइल मिळवलेल्या देशातील पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांमध्ये नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील तनिष्क भगतने २७वा क्रमांक मिळवला. नियमित अभ्यास आणि त्यातील बारकावे शोधणे हेच यशाचे खरे गमक असल्याचे तनिष्क सांगतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत. यंदा देशभरातील ४ हजार ९७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. २० लाख८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur manish bhagat ranks 27th in neet examination in india dag 87 zws