-महेश बोकाडे
मध्य भारतातील गरीब कर्करोगग्रस्तांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागाला उतरती कळा लागली आहे. येथील रुग्णांना लाईट्स देणारे बहुतांश यंत्र बंद आहेत.त्यात आता कोबाल्ट यंत्राची भर पडली.
कर्करोग विभागाला २००६ मध्ये कोबाल्ट यंत्र आणि त्यानंतर ब्रेकी यंत्र मिळाले होते. परंतु ब्रेकी यंत्र निकामी झाले आहे. कोबाल्ट यंत्र कालबाह्य असले तरी कसेतरी काम काढले जाते. त्यातच ते ही बंद पडले.
दुरुस्तीसाठी मुंबईहून तंत्रज्ञ आल्यावर हे यंत्र सुरू होणे शक्य होणार आहे. सध्या कोबाल्टवर रोज सुमारे ७० हून जास्त रुग्णांना लाईट्स दिले जाते.