नागपूर : विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. रोहित गणेश टेकाम (२५, कान्हादेवी, पारशिवनी) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना (३२, बदलेले नाव) ही हुडकेश्वर खुर्दमध्ये राहायची. संजना ही मूळची मध्यप्रदेशची असून कामाच्या शोधात सहा वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. तिचा पती एका ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करतो तर मुलगी सातव्या वर्गात शिकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजनाचा पती सकाळी ढाब्यावर गेल्यानंतर थेट मध्यरात्री एक वाजता घरी येतो. संजनाला दारुचे व्यसन होते. त्यामुळे वस्तीतील तीन ते चार दारुड्या युवकांशी तिची मैत्री होती. रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री असून गेल्या दोन वर्षांपूर्वी तो हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर आला होते. तेव्हाच संजना आणि रोहितची ओळख झाली होते. दोघेही मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या वारंवार भेटी व्हायच्या. पती घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला येत होता. गुुरुवारी पती कामावर गेल्यानंतर संजनाने रोहितला फोन केला. त्याला घरी बोलावले. तो महालगाव कापसीवरुन काम सोडून तिच्या घरी आला. संजनाने दारुची बाटली आणण्यास सांगितले. दोघांनी दारु ढोसली आणि जेवण केले.

संबंधास नकारामुळे केला खून

रोहितने संजनाला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, संजनाने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रोहितने तिला ‘मला घरी कशाला बोलावले मग?’ असा प्रश्न केला. त्यानंतर दारुच्या नशेत त्याने तिला मारहाण केली. तरीही तिने संबंधासाठी नकार दिला. शेवटी रोहितने तिच्याच ओढनीने गळा आवळला आणि खून केला. त्यावरही त्याचे समाधान झाले नाही. त्याने संजनाच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि पळ काढला.

अशी आली घटना उघडकीस

सायंकाळी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर तिला आई खाली पडलेली दिली. तिच्या कानातून रक्त येताना दिसले. तिने काही कपडे तिच्या अंगावर झाकून शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि तिच्या पतीला फोनवरुन माहिती दिली. हुडकेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावार बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. संजनाच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगवरुन हत्याकांडाचे गुढ उलगडले. रोहितला पोलिसांनी अटक केली. त्याने हत्याकांड आणि बलात्कार केल्याची कबुली दिली.