नागपूर शहरातील मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा मंगळवारी सकाळपासून (४ सप्टेंबर) सुरू आहे. त्यासाठी नागपूरसह इतर जिल्यातून उमेदवार नागपूरच्या वाडी येथील परीक्षा केंद्रावर पोहचले. परंतु येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या गोंधळात अनेक उमेदवार परीक्षाला मुकल्याने आल्या पावली परतल्याचा आरोप आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपुरातील मेडिकल आणि मेयोसह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर, शिपाई, हमाल, कक्ष परिचर, गँगमन, माळी, संग्रहालय परिचर, किचन, स्टोअर बॉय, क्लीनर अशी वर्ग-४ ची ६८० पदे भरली जाणार आहेत. यासाठी आयबीपीएस एजन्सीमार्फत ४ सप्टेंबरला परीक्षा सकाळी घेतली गेली. परीक्षेचे एक केंद्र वाडीतही होते. या केंद्रात परीक्षेच्या वेळेवर सकाळी साडेसात वाजता उमेदवार पोहचले. दरम्यान काही महिलांनी लग्नानंतर आवश्यक कागदपत्र सोबत आणले नसल्याचे सांगत त्यांना केंद्रातून बाहेर काढले गेले. या महिलांना परीक्षा देता आली नसल्याने त्यांनी केंद्राच्या बाहेर गोंधळ घालत परीक्षा प्रक्रियेवरच आक्षेप घेतला. तर काही पुरुष उमेदवारांना कागदपत्रांची दुय्यम प्रत मागण्यात आली. ती आणायला गेल्यावर उमेदवार काही मिनीट विलंबाने पोहचले. त्यांनाही पेपर देण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. उमेदवारांनी पोलिसांना फोन केल्यावरही ते सकाळी वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे पोलिसही ऐकायला तयार नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला. दरम्यान २६ ऑगस्टलाही या पद्धतीचा गोंधळ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेत याच केंद्रावर झाला होता, हे विशेष.
वाटा सविस्तर… एमबीबीसच्या विद्यार्थ्यांना आता ‘याचा’ही अभ्यास करावा लागणार, मिळणार विशेष गुण
६८० पदांसाठी ६४ हजार अर्ज
जिल्हा निवड समितीमार्फत मेडिकल, मेयो, दंत, आयुर्वेद व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र काटोल येथे पदभरती प्रक्रिया सुरू आहे. २० जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागवण्यात आले. एकूण ६८० पदांसाठी ६४ हजार उमेदवारांनी अर्ज केले. या पदांसाठी किमान पात्रता १० वी उत्तीर्ण अशी आहे. परीक्षेसाठी एप्रिलपासून विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांची फेरी सुरू आहे.
हे ही वाचा… नागपूरच्या प्रसिद्ध मारबत मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला अत्याचाराचा निषेध करणारे बडगे
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी, आयुर्वेद, दंत महाविद्यालयामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे स्वच्छता, रुग्णांना एका ठिकाणाहून इतरत्र हलवणे, रुग्णांच्या जखमांची मलमपट्टी, विविध तपासणीशी संबंधित कामांमध्ये अडचणी येतात. रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने येथे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे वाढवण्यासाठी शासनाला मागणी केली जाते. परंतु विविध कारणाने परवानगी मिळत नाही. यंदा जिल्हा निवड समितीमार्फत येथील ६८० पदांसाठीची पदभरती होत असून हे काम आयबीपीएस एजन्सीला देण्यात आले आहे. तर परीक्षेसाठी मेडिकल- मेयोतीलही बऱ्याच अधिकारी- कर्मचाऱ्यांचा तेथे सेवा लावण्यात आल्या होत्या.