नागपूर: महा मेट्रोने गेल्या सहा वर्षांत अनेक मैलाचे दगड पार केले. सुरुवातीच्या मर्यादित सुविधांपासून तर आतापर्यंत सतत नवनव्या उपक्रमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी केला.  सहा वर्षानंतर मेट्रो दररोज ४० किमी धावत असून ३८ मेट्रो स्थानकावरून प्रवाशांना सुविधा देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामेट्रोने ७ मार्च २०१९ रोजी खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि सीताबर्डी इंटरचेंज या फक्त पाच स्थानकांसह प्रवासी सुविधा सुरू केली होती. सहा वर्षांत महा मेट्रोने ८,८३,६५,७०५प्रवाशांची वाहतूक केली आहे.

महा मेट्रोने आज शहराच्या चारही दिशांनी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. उत्तर-दक्षिणला जवळ करीत ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपासून खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनपर्यंत पूर्व-पश्चिम भागाला महामेट्रोने जोडले. या दोन्ही मार्गांवरील संपूर्ण प्रकल्प ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण करण्यात आला. १ जानेवारी २०२३ रोजी २,२०,४९७ ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवली होती.

 तेव्हापासून महा मेट्रो आज व्हॉट्सअॅप तिकीट काढण्यापासून ते सेलिब्रेशन ऑन व्हील्सपर्यंत अनेक सेवा प्रवासी व नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. नियमित प्रवाशांसाठी १०% आणि विद्यार्थ्यांसाठी ३०% सवलत असलेले महाकार्ड हिट ठरले आहे. आतापर्यंत, महामेट्रो नागपूरने एक लाखाहून अधिक महा कार्ड विकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या कार्डचे महत्त्व अधोरेखित होते. दैनिक पास, राजपत्रित सुट्ट्यांवर सवलत आणि आठवड्याच्या शेवटी सवलत या महामेट्रो, नागपूरद्वारे देण्यात येत असलेल्या काही प्रमुख सेवा आहेत.