नागपूर: नागपूर मेट्रोने डिजिटल तिकीट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी काढलेल्या मोफत महाकार्ड योजनेला १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.तिकीट खरेदीसाठी प्रवाशांचा रांगेत उभे राहण्यात वेळ जात असल्याने महामेट्रोने मोफत डिजिटल मेट्रोकार्ड योजना सुरू केली. त्यानुसार प्रवाशांना दोनशे रुपये जमा करून हे कार्ड मिळणार असून ही सर्व रक्कम त्यांना प्रवासासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे हे कार्ड त्यांना मोफत मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासाठी १५ जूनपर्यंत मुदत होती. मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून महामेट्रोने आता १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. १६ मेपासून ही योजना सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाच हजार प्रवाशांनी हे कार्ड खरेदी केले. या कार्डवर तिकीट दरात दहा टक्के सवलत दिली जाते. या कार्डमुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur metro launches free mahakart to promote digital ticket sales cwb 76 amy