नागपूर : वस्तीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेवर एका युवकाचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, ती महिला त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे ती मुलाला शाळेतून घरी नेत असताना तिच्या अंगावर मोबाईल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी फेकली. महिलेने आरडाओरड केल्यामुळे नागरिक गोळा झाले. नागरिकांनी त्या युवकाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रतुल वसंत सुटे (४४) रा. एमआयडीसी, असे अटकेतील आरेापीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्नी व ८ महिन्यांच्या मुलासह राहणाऱ्या विवाहित प्रतुल सुटे हा खासगी काम करतो. दोन महिन्यांपासून तो ३२ वर्षीय महिलेचा पाठलाग करीत होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करीत होता. तिच्या घरासमोर तासनतास बसून तिच्याकडे बघत होता. बुधवारी दुपारी महिला तिच्या मुलाला शाळेतून घरी नेत होती. या दरम्यान प्रतुलने तिचा पाठलाग केला आणि महिलेकडे एक चिठ्ठी फेकली. त्या चिठ्ठीत प्रतुलचे नाव आणि नंबर लिहिलेला होता. महिलेने रस्त्यावरील नागरिकांकडे मदत मागितली. नागरिकांनी प्रतुलला जाब विचारला. त्याने महिलेवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी प्रतुलला चांगला चोप दिला. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. महिलेने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रतुलला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur midc police arrested the youth who molested the girl crime news adk 83 amy