नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल. मात्र, यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आतापर्यंतचा ‘कट ऑफ’ काय राहिला हे बघुया. दरवर्षी राज्यसेवा परीक्षेचा ‘कट ऑफ’ वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘सीॲक’च्या केंद्रांची दुरवस्था, संघ परिवारातील संस्थेला मात्र ५२ एकर जागा! राज्य शासनाच्या निर्णयाने आश्चर्य

एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम स्पर्धा वाढली असून ‘कट ऑफ’ही वाढत आहे. २०१७ मध्ये ३७७ पदांसाठी ‘कट ऑफ’ ४३४ होता. तर २०१८ मध्ये हा ‘कट ऑफ’ ४६७ होता. २०१९ ला ४५९, २०२० ला ४६७, २०२१ ला ४७७ तर २०२२ला ४८८ एवढा ‘कट ऑफ’ आहे. या आकडेवारीवरुन दरवर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा कट ऑफ वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी आता अधिकची मेहनतही करावी लागणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mpsc exam result declared know the cut off of mpsc exam result from last 5 years dag 87 css
Show comments