अकोला : आगामी काळात येणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेता रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई -नागपूर आणि नागपूर – पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावण महिन्यात सणासुदीच्या काळाला प्रारंभ झाला. येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी आहे. त्यानंतर १८ ऑगस्टला रविवार असून १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाचा सण व सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर – मुंबई व नागपूर – पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला.

हेही वाचा – जातवैधता पडताळणी समितीच्या कार्यप्रणालीवर न्यायालयाची नाराजी, म्हणाले “न्यायालयापेक्षा समिती मोठी नाही…”

लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई – नागपूर विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या धावणार आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२१३९ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १५ ऑगस्ट रोजी ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचणार आहे. विशेष गाडी क्रमांक ०२१४० नागपूर येथून १६ ऑगस्ट रोजी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा असे थांबे राहणार आहेत. या गाडीची संरचनेमध्ये एक वातानुकूलित-प्रथम, तीन वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय आणि २ जनरेटर व्हॅन अशी राहील.

हेही वाचा – चंद्रपूर की मिर्झापूर? कुख्यात गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

नागपुर – पुणे विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. विशेष गाडी क्रमांक ०२१४४ नागपूर येथून १४ आणि १६ ऑगस्ट रोजी १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०२१४३ पुणे येथून १५ आणि १७ ऑगस्ट रोजी १६.१० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरली या स्थानकावर थांबे राहणार आहेत. १४ वातानुकूलित-तृतीय आणि २ जनरेटर व्हॅन अशी गाडीची संरचना राहील. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mumbai and nagpur pune special trains will run ppd 88 ssb
Show comments