नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात येत्या काही महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासक व महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोणत्याही प्रकराचे कर नागपूरकरांवर लादले नाहीत. मागील अर्थसंकल्पातील ६९८.८७ कोटी रुपये खर्च न करता २०२५-२६ वर्षीचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.

१)ॲडव्हेंचर गार्डन

लता मंगेशकर उद्यानाच्या ४ एकर परिसरात लहान मुलांकरिता ॲडव्हेंचर पार्क तयार करण्यात येणार आहे.

२)मुख्य मार्गावरील वीज खांब काढून त्याऐवजी भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.

३)  व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. हे स्टेशन जयताळा बाजार चौक (ऑरेंज स्ट्रीट), रहाटे कॉलनी चौक, दयानंद पार्क, पोलीस मोटर ट्रॉन्सपोर्ट सेक्शन काटोल, रोड, पत्रकारभवन जवळील पार्किंगच्या जागेमध्ये ययशवंत स्टेडियमजवळ, वाडी नाका, अमरावती, रोड, फुटाळा रोड, पोलीस चौकीजवळ, बुधवारी बाजारात सक्करदरा, पाण्याच्या टाकीजवळ‌, शांतीनगर, मेन रोड, पाण्याच्या टाकीजव‌ळ, अंजूमन कॉलेजच्या मागे मंगळवारी कॉम्लेक्स, सेट्रल बाजार रोडवर तुली एम्पीरियर हॉटेलच्या पार्किंगच्या विरुद्ध बाजूला या ठिकाणी केंद्र स्थापन केले जातील.

४)ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प : भाजी व मटन मार्केट विकसित करण्यात येणार आहे.

५)नरेंद्रनगर उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच महापालिकेच्या जागेवर क्लिन स्ट्रीट फूड हब विकसित करण्यात येणार आहे.

६)नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प : यावर्षी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहेे.

७) ग्रीन बिल्डिंग असणाऱ्यांना मालमत्ता धारकांना आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पासून करात सुट देण्यात येणार आहे.

८)मालमत्ता करधारकांना स्पीड पोस्टद्वारे मागणी देयक पोहोचवण्यात येत आहे. याशिवाय पुढील वर्षी वॉटस ॲपवर सुद्धा देयक उपलब्ध करण्यात येईल.

९)भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील सुमारे १०.५ लाख टन कचरा सप्टेंबर २०२६ पर्यंत काढण्यात येणार असून याद्वारे सुमारे २१ एकर क्षेत्र रिकामे करण्यात येईल.

१०) खासगी इमारती आणि आस्थपनावरील भाड्याने देण्यात येणाऱ्या होर्डिंगवर कर लावण्याचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

११)टप्पा-४ अंतर्गंत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत २३.४५ किलोमीटर सिमेंट रस्ते पूर्ण करण्यात येतील.

१२)पैसे द्या व वापरा या तत्वावरील सार्वजनिक शौचलये निर्माण करण्यात येतील.

१३)पीएम-ई बसेस आणि इतर योजनांमधून सुमारे ६०० ई-बसेस पुढील वर्षात नागपुरात धावतील.

१९)शहरातील १९ दहन घाटांवर टप्प्याटप्प्याने एलपीजी आणि विद्युत शवदाहिनीची व्यवस्था करण्यात येत आहे.

२०)शहरातील सर्व महापालिकेच्या शाळांध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. २१)खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता पदकप्राप्त खेळाडूंसाठी उडान खेल प्रोत्साहन योजना सुरू करण्यात येईल. त्याअंतर्गंत रोख रक्कम देण्यात येणार आहे.

Story img Loader