नागपूर : शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आवश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा महापालिकेने दिला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नागनदी इतर नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा. अंबाझरी तलाव फुटल्या नसल्यामुळे किंवा कुठलीही भिंत खचली नाही..अंबाझरी तलावाचे पाणी ओव्हरफ्लो झाले आहे .त्यामुळे कुठल्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तलाव अथवा ओव्हरफ्लोकडे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… नागपूर : मुसळधार पावसाचा तडाखा, शंकर नगरसह महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित

हेही वाचा… Photos : नागपूरकरांची मुसळधार पावसामुळे दाणादाण, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, वस्त्यांमध्ये पाणी

नागपूर महागरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच महापालिकेला ०७१२२५६७०२९ किंवा ०७१२२२५६७७७७७ या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले आहे.