बजाजनगर काचिपुरा येथील भूखंडधारकांना महापालिकेने नोटीस बजावताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.ज्या भूखंडधारकांना नोटीस बजावली त्यात पक्षाचे नेते प्रशांत पवार यांचा समावेश आहे. व तेथे त्यांचे कार्यालय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी तडकाफडकी पत्र काढून संबंधित कार्यालयाशी पक्षाचा संबंध नाही, असे स्पष्ट केले.
हेही वाचा >>> ‘कुणाच्या घरातील भांडणाशी देणे-घेणे नाही’; नाना पटोले म्हणाले, ‘जिसका नाम होता है, उसी को…’
विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनाला स्वतः शरद पवार यांच्यासह विदर्भाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. प्रशांत पवार यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यालय असा मोठा फलकही लावण्यात आहे.
कार्यालयासमोर लावलेल्या फलकावर नेत्यांचे फोटोसुद्धा आहेत. शरद पवार यांनी स्वाक्षरी केलेला एक फोटोही कार्यालयात आहे. यापूर्वी महापालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनाही नोटीस पाठवली होती.