देशातील पहिल्या सर्वांत उंच अशा येथील फुटाळा तलावातील ‘संगीतमय कारंजी आणि लाईट शो’ प्रकल्पाला गानसम्राज्ञी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.प्रकल्पाचे उद्घाटन राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते न करता देशातील श्रेष्ठ कलावंताकडून केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गडकरी यांच्या संकल्पनेतून फुटाळा तलावात संगीतमय कारंजी प्रकल्प साकार झाला आहे. त्याचे प्रात्यक्षिक बुधवारी करण्यात आले. यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा – भंडारा : सुस्थितीत आणि वापरातील शौचालय पालिकेने केले जमीनदोस्त
गडकरी म्हणाले, दिवंगत लता मंगेशकर यांची संगीतक्षेत्रातील कामगिरी अत्युल्य अशी आहे. त्यांचे नाव कारंजी प्रकल्पाला देण्याचा विचार आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन देशातील श्रेष्ठ कलावंताच्या हस्ते केले जाईल. या प्रकल्पाचे काम फ्रान्स येथील कंपनीने केले आहे. दुबईनंतर हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहेत.