अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयालय उपाध्याय या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हे देखील वाचा – गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात; वाहकासह विद्यार्थी जखमी

लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे आयोजित एकल विद्यालयातील शिक्षकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी रेशीमबाग येथील स्मृती भवन सभागृहात झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्रनाथ महाराज, चित्रपट अभिनेत्री निशीगंधा वाड, विजयकुमार गुप्ता आणि राजू हडप उपस्थित होते.

बुलढाणा : ‘स्कायमेट’चा अंदाज आता शेतकऱ्यांना समजणार नसल्याने रविकांत तुपकरांची सरकारवर टीका

भाजपच्या उत्कर्षाचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले, “काही वर्षांपूर्वी मी प्रथमच पक्षाच्या कार्यक्रमासाठी बांद्रा (मुंबई) येथे गेलो होतो. त्यावेळी पक्षाची फार वाईट स्थिती होती. कार्यक्रम सायंकाळचा होता. अटलजी भाषणासाठी उभे झाले आणि मावळत्या सूर्याकडे बघून ते बोलू लागले. ते म्हणाले, ‘मी मावळत्या सूर्याकडे बघतो आहे. पण, हा अंधार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ उमलेल’. ज्यावेळी अटलजी हे बोलत होते त्यावेळी उपस्थितांमधील सर्वांना ही स्थिती बदलेल याबाबत विश्वास होता. आज ते प्रत्यक्षात उतरले.”

अटलजी, अडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि अनेक कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले म्हणून आज मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता आली. अनेक राज्यातही पक्ष सत्तेत आहे.

Story img Loader