Today Nagpur News Updates : काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या रुपचंदानी कुटुबातील महिला जखमी झाली आहे. दरम्यान काश्मीरमध्ये नागपूरहून पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या ४० ते ५० असून त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे. हे सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडायला बुलढाणा शहरातील जैन कुटुंबीयांना उशीर झाला. याच दरम्यान अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. हॉटेल मालक व प्रबंधक यांनी त्यांना बाहेर जाण्यास मनाई केली. यामुळे ते हॉटेलमध्येच थांबले. जैन कुटुंबीय सुखरूप आहेत. नागपूर आणि विदर्भशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Nagpur News Today, 23 April 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ जण काश्मीरमध्ये अडकलेले…
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’
दहशतवादी हल्ल्याविरुद्ध यवतमाळात दोन्ही शिवसेनेकडून निषेध आंदोलन…
रेल्वे प्रवाशांनो, ‘या’ एक्स्प्रेसचे आरक्षण 'हाउसफुल्ल'! पुणे - मुंबई- हावडा मार्गावर…
वैष्णोदेवी पावली….८६ वर्धेकर काश्मीरमध्ये….सीआरपीएफ बटालियनच्या तंबूतून…
यूपीएससी : गडचिरोलीच्या आदिवासी पाड्यावरील 'शुभम'कडून पहिल्याच प्रयत्नात गड सर, आईवडील शेतात असताना ….
यूपीएससी: मुलाखतीला जाताना रेल्वेच्या तिकीटाची अडचण, घरातील हलाखीची परिस्थिती; शिकवणी न लावता मिळवले यश
दहशतवादी हल्ल्यावर विश्व हिंदू परिषद म्हणते…
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या फोटोला बांगड्या दाखवत राजीनाम्याची मागणी, पहलगाम हल्यावरून शिवसेना आक्रमक
सुर्य कोपला… नागपुरात उष्माघाताचे पाच बळी?… महापालिका म्हणते तीन….
'समृद्धी'वर कार पुलाला धडकली! दोघे ठार, तीन जखमी…
नागपूरच्या पर्यटकांना आला होता संशय, अडकलेल्या पर्यटकांसोबत अनिल देशमुखांचा संवाद
Pahalgam Terror Attack : अमरावतीचे ३६ पर्यटक सुखरूप, गोळीबार सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी…
काश्मीर हल्ला : नागपुरातील ५० यात्रेकरू सुखरूप
काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागपूरच्या रुपचंदानी कुटुबातील महिला जखमी झाली आहे. दरम्यान काश्मीरमध्ये नागपूरहून पर्यटनासाठी गेलेल्यांची संख्या ४० ते ५० असून त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे. हे सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.
पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बुलढाण्यातील जैन कुटुंबीय बचावले, हॉटेलमधून बाहेर पडायला उशीर झाला अन्…
लढाणा : मानवी आयुष्यात घड्याळाचे अर्थात वेळेचे खूपच महत्त्व आहे. अचूक वेळेवर कोणतेही काम करणे महत्त्वाचे आहे, पण कधी कधी अपरिहार्य कारणांमुळे, कळत नकळत झालेला उशीरदेखील उपकारक ठरतो. बुलढाणा शहरातील जैन परिवाराला याचा जिवंत प्रत्यय आला. तो देखील बुलढाणायापासून हजारो किलोमीटर अंतरावरील आणि भीषण दहशतवादी हल्ल्याचे साक्षीदार ठरलेल्या जम्मू काश्मीरमधील पहेलगाममध्ये.
(image credit - pti)