Today Nagpur News Updates : अलीकडेच नागपूर भेटीत वनमंत्र्यांनी आता म्हणे माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे सांगितले. कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वन मंत्री नामदार गणेश नाईक यांनी सांगितले. विदर्भच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तापमानाचा पारा झपाट्याने उंचावतो आहे. विशेषकरून विदर्भातील शहरांमध्ये दररोज तापमानाचे नवे उच्चांक नोंदवले जात आहेत. नागपूरसह विदर्भातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…

Live Updates

H2: Nagpur Breaking News Update, 24 April 2025

18:24 (IST) 24 Apr 2025

धक्कादायक! ‘बीपी’च्या तब्बल दोनशे गोळ्या घेऊन संपवले जीवन…

यामुळे जिल्ह्यात या आत्महत्येची उलट सुलट चर्चा होत आहे. …सविस्तर वाचा
18:15 (IST) 24 Apr 2025

विदेशात शिक्षणासाठी जायचंय? विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याची मोठी संधी, वाचा कसा लाभ घ्यावा…

परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ मेपर्यंत अर्ज मागविण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिली. …अधिक वाचा
18:14 (IST) 24 Apr 2025

शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी दोघांना अटक, आरोपी काही शाळा आणि ‘बार’चा मालक?

या प्रकरणाचा तपास सदर पोलीस आणि सायबर पोलिसांकडून सुरू आहे. …वाचा सविस्तर
17:57 (IST) 24 Apr 2025

एसटीच्या उत्पन्नाचा आलेख ऐन उन्हाळ्यात घसरला… राज्यातील ३१ पैकी दोनच विभाग…

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित न केल्यास काय होईल, याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी गंभीर इशारा दिला आहे. …अधिक वाचा
17:49 (IST) 24 Apr 2025

अल्पवयीन मुलीचे सर्वस्व लुटले; बाळाला जन्म देखील दिला, मात्र…

या प्रकरणी एका युवकाविरोधात अकोट फैल पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
17:34 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याप्रकरणी रोखठोक कारवाई करा, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) निषेध आंदोलन

Pahalgam Attack: यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. …अधिक वाचा
17:10 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Attack: अंधाधुंद गोळीबाराचा आवाज येताच जीव मुठीत घेऊन पळालो, प्रत्यक्षदर्शी कांबळे कुटुंबियांनी सांगितली आपबीती

Jammu and Kashmir Terror Attack: स्वप्नील कांबळे, पत्नी प्रीती, मुलगा रियांश आणि पुतणी एंजल असे चौघे जण श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. …सविस्तर बातमी
16:46 (IST) 24 Apr 2025

ऑटोरिक्षा चालकाची मुलगी अदिबा बनणार महाराष्ट्राची पहिली मुस्लीम महिला आयएएस अधिकारी, संघर्षमय प्रवास…

तिचा संघर्षमय प्रवास कसा होता हे जाणून घेऊया. …सविस्तर वाचा
16:08 (IST) 24 Apr 2025

नराधमास २० वर्षांचा सश्रम कारावास

मलकापूर अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव यांनी हा गुन्हेगारांना जरब बसविशणारा निकाल दिला आहे. …सविस्तर बातमी
15:41 (IST) 24 Apr 2025

ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळली; ३२ प्रवासी जखमी, सात प्रवाशांची प्रकृती चिंताजनक

सर्व जखमी प्रवाशांना भिवापूर व उमरेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे. …वाचा सविस्तर
15:14 (IST) 24 Apr 2025

Video : ताडोबात हरियाणातील पिंजोर येथून पाच नवे पाहुणे आलेत; जाणून घ्या कोण ते?

महाराष्ट्र वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सोडण्यात आलेल्या गिधाडांची प्रकृती सध्या चांगली आहे. …सविस्तर बातमी
15:13 (IST) 24 Apr 2025

राज्यात तापमान वाढताच उष्माघाताचे रुग्ण वाढले… या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण…

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ मार्च ते २१ एप्रिल २०२५ दरम्यान उष्माघाताचे ४९ रुग्ण नोंदवले गेले. …सविस्तर बातमी
14:49 (IST) 24 Apr 2025

भाजप आमदारांना शिवीगाळ करणे ठाणेदाराला चांगलेच भोवले, पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याने…

या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देऊन ठाणेदाराचे निलंबन करण्याची मागणी केली होती. …सविस्तर बातमी
14:24 (IST) 24 Apr 2025

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्याची पर्यटनाला झळ! काश्मीर टुर्सची आरक्षणे पर्यटकांकडून रद्द; कंपन्यांना कोट्यवधीचा फटका

Jammu and Kashmir Terror Attack Updates: चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ते २० टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. …सविस्तर वाचा
14:12 (IST) 24 Apr 2025

VIDEO: ताडोबात शिरला श्वान आणि मग वाघाची धावाधाव…

Tiger Dog Video: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रात ही घटना उघडकीस आली. …अधिक वाचा
13:47 (IST) 24 Apr 2025

पत्नीने दिला पतीच्या गर्भवती प्रेयसीला चोप…

प्रेयसी तीन महिन्यांची गर्भवती असताना प्रियकर विवाहित असल्याची माहिती समोर आली, त्यामुळे प्रेयसीने पोलिसांत तक्रार केली, पोलिसांनी विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. …अधिक वाचा
13:45 (IST) 24 Apr 2025

उष्णतेचा कहर! ताडोबा प्रकल्पाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली; जंगल सफारीचे बुकिंग रद्द

उष्णतेची लाट बघता ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. …सविस्तर वाचा
13:35 (IST) 24 Apr 2025

वाघोबा दडलाय? वनाधिकाऱ्यांनी सांगितले गाव सुरक्षेचे उपाय…

नागपूर वनवृत्त विभागाच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी व्याघ्र परिवार भटकंती असलेल्या गिरड भागात बुधवारी सायंकाळपर्यंत पाहणी केली. …सविस्तर बातमी
13:11 (IST) 24 Apr 2025

महाराष्ट्रात अशीही ग्रामपंचायत आहे, जी स्वखर्चातून राबवते ‘हे’ सामाजिक उपक्रम

गोंदिया: गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहाडी ग्रामपंचायतीने शासनाच्या अनुदानाशिवाय बरेच सामाजिक उपक्रम चालवले आहेत. यामध्ये गावातील कोणत्याही मुलीच्या जन्माच्या आणि कन्यादान म्हणून ११०० रुपये दिले जातात.

वाचा सविस्तर…

13:10 (IST) 24 Apr 2025

‘त्या’ १५ गिधाडांचे तेराशे किलोमीटरचे स्थलांतर…

अमरावती: सुमारे तेराशे किलोमीटर अंतरावरील हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रातून आणलेल्या ३४ गिधाडांचे महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम स्थलांतर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १५ गिधाडांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा रेंजमधील ‘प्री-रिलीज’ पक्षीगृहात यशस्वीरीत्या सोडण्यात आले.

सविस्तर बातमी…

13:09 (IST) 24 Apr 2025

चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती; चौकशी समिती ७ मे रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील ३६० लिपीक आणि शिपाई पदाची नोकर भरती आरक्षण वगळून करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या नेतृत्वात एक चौकशी पथक ७ मे रोजी चंद्रपुरात दाखल होणार आहे.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 24 Apr 2025

उन्हाचा पारा ४५.५, शाळा वेळापत्रकात बदल, परिपत्रक निघाले; शाळा, कॉन्व्हेंट आता अकरापर्यंत

गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर व ब्रम्हपुरी शहराने तापमानाचा उच्चांक गाठला आहे. पारा ४५.८ अंशावर पोहोचला आहे. बुधवारी पुन्हा एकदा चंद्रपुरात ४५.५ तर ब्रम्हपुरीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शाळा वेळापत्रक बदल केला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवा व त्यानंतर सुटी द्या असे निर्देश दिले आहेत.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 24 Apr 2025

Vidarbha Heatwave Update: उष्ण शहरांच्या जागतिक यादीत विदर्भातील तीन शहरे, पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेच्या लाटा

विदर्भच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तापमानाचा पारा झपाट्याने उंचावतो आहे. विशेषकरून विदर्भातील शहरांमध्ये दररोज तापमानाचे नवे उच्चांक नोंदवले जात आहेत.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 24 Apr 2025

गडकरी म्हणतात, “मी मासोळी खात नाही, वासही घेत नाही, पण व्यवसाय करायला हरकत काय?”, मुलाने १५० कोटींची…

त्यांचा हा सल्ला सर्वच समाजातील नवउद्योजकांसाठी प्रेरणादायक आहे. …वाचा सविस्तर

नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स