नागपूर : रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला तिच्या रक्षणाचे दिलेले वचन. तिच्या रक्षणाची घेतलेली जबाबदारी. मात्र, देशात सध्या सुरू असलेल्या घटना पाहता येथे कुणाचीही बहीण सुरक्षित नाही, असेच वातावरण आहे. त्यामुळे आता प्रत्येक भावाने बहिणीला एक वचन द्यावे आणि बहिणीने भावाकडून ‘रक्षाबंधनाला, मी कोणालाही आया बहिणीवरून शिव्या देणार नाही असे वचन भावा कडून बहिणींनी घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्व व्यक्ती समान आहेत, त्यामुळे कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव न करता आदराने वागवा. महिलांचा सन्मान करा, अशी शिकवण सर्वच धर्म देतात. मानवी जीवनात आईचे स्थान सर्वोच्च आहे. आई वात्सल्याचे, उत्कट प्रेमाचे, ममतेचे समर्पणाचे प्रतिक आहे. आईची महती अपार आहे. म्हणूनच ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे म्हंटल्या जाते. आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणून संबोधतो, मातृभूमी म्हणून अभिमानाने देशाचा उल्लेख करतो. आमची स्त्री रुपातली दैवत सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा, भवानी, जगदंबा, अंबादेवी आदी सर्व देविंनाही आम्ही मां, माता, आई आदी विशेषण लावतो. एकीकडे मातृदिन, महिला दिन, रक्षाबंधन, भाऊबीज साजरी करायची, मातृ वंदन, एक पेड मां के नाम, लाडकी बहिण सारख्या योजना राबवायच्या आणि दुसरीकडे आया बहिणींच्या जनेंद्रियांचा उल्लेख करत अत्यंत अश्लील शब्दात शिव्या द्यायच्या. ही विरोधाभासी कृती आमच्या माता भगिनिंचाच नव्हे तर एकूणच स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा शिव्यांना पायबंद घातला गेलाच पाहिजे. त्याकरिता राज्यात शिव्यामुक्त समाज अभियान राबविण्यात येत आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रातील १०० गावात आता शंभर टक्के सौर प्रकाश; ही आहे योजना…
भावा बहिणींचे नाते जिव्हाळा, आदर, विश्वास, नि:स्वार्थ प्रेम यावर आधारलेले एक अनोखे नाते आहे. भावाकडून एखादी गोष्ट बहीण हक्काने, प्रेमाने मिळवून घेऊ शकते. बहिणीचा तो अधिकार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधताना त्यांचेकडून ओवाळणी म्हणून ‘मी कोणालाही आया बहिणींवरून शिवीगाळ करणार नाही’, असे वचन घ्यावे व शिव्यामुक्त समाज अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन ‘मास्वे’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिव्यामुक्त समाज अभियान, महाराष्ट्राचे संयोजक प्रा. अंबादास मोहिते यांनी केले आहे. समाजाचे नैतिक अध:पतन रोखण्यासाठी, आपल्या समृद्ध संस्कृतीच्या रक्षणासाठी तसेच संविधानिक मूल्यांची जोपासना व लिंगाधारीत समानता आणि सुसंस्कृत समाजाकरीता माता भगिणींनी आपल्या भाऊरायाकडून राखीपोर्णीमेला असे वचन घेणे सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मत प्रा. मोहिते यांनी व्यक्त केले आहे.