दोन दिवस अधूनमधून विश्रांती घेणारा पाऊस गुरुवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अजनी परिसरात भिंत कोसळून एक जण ठार झाल्याची माहिती आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे रस्त्यावर साचलेले आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असतांना नवीन पावसाने शहरातील परिस्थिती पुन्हा जलमय झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बऱ्याच वर्षानंतर उपराजधानीत संततधार दिसून येत आहे. सलग दहा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. मंगळवारी रात्री देखील मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. आता पुन्हा गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने तीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदीनाल्याचे स्वरूप आले.

या पावसामुळे वस्त्याच नाही तर अनेक मोठे गृहप्रकल्पदेखील पाण्याने वेढले आहेत. मानकापूर पलोटी नगर, वाठोडा, नंदनवन झोपडपट्टी गल्ली क्रमांक दोन या भागातील अनेक घरात व झोपडपट्टी पाणी शिरले. हुडकेश्वर परिसरात एक झाड पडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur one dies after wall collapses in ajni housing projects flooded in many places msr