नागपूर : एकतर्फी प्रेम करीत असलेल्या युवकाने मैत्रिणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्याशी रस्त्यावरच अश्लील चाळे करीत विनयभंग केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिमांशू रविशंकर चंद्राकार (वय २८, रा. प्रतापनगर) असे आरोपीचे नाव आहे.

हिमांशू हा बेरोजगार असून दारुड्या आहे. घराजवळ राहणाऱ्या एका युवतीशी त्याची ओळख आहे. ती युवती बीसीएला शिकत आहे. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. परंतु, तो तिला नेहमी शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे ती युवती त्याला कंटाळली होती. वारंवार फोन करीत असल्यामुळे युवतीने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. त्यामुळे आरोपी हिमांशूला तिचा राग आला.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

हेही वाचा : ‘चंद्रभागे’च्या काठावर सापडली, कष्टाने बारावी झाली, नोकरीही लागली अन पुन्हा मृत्यूच्या..!

मंगळवारी युवती आपल्या दोन मैत्रीणींसोबत घरासमोर उभी असताना आरोपी हिमांशू तिथे आला. ‘तुझ्याशी बोलायचे आहे. बाजुला चल’, असे तो युवतीला म्हणाला. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. परंतू, युवतीने विरोध केल्यामुळे आरोपीने तिचे केस पकडून तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. त्यानंतर युवतीच्या मैत्रीणीकडे पाहून ‘तुझ्या मैत्रीणीला माझ्याकडे पाठव, नाहीतर तुला जिवानिशी ठार मारेन,’ अशी धमकी दिली. काही वेळातच आरोपी तेथून पळून गेला. युवतीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.