नागपूर : पावसाच्या सरी पडल्यावर कुणाला गरमा गरम भजी तर कुणाला पकोडे तर कुणाला चहा वा इतर पदार्थ खाण्याची इच्छा होते. कुणी पाणीपुरी, भेलपुरीसह इतरही पदार्थ खातात. हल्ली दूषित पाण्यामुळे आजारी पडणारे रुग्ण वाढत आहे. दरम्यान अन्न व प्रशासन विभागाने नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे म्हणून अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी बरेच नियम केले आहे. हे नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांकडे दूषित पाण्याचे पदार्थ खाल्यास नागरिकांना विषबाधेचाही धोका आहे. या विक्रेत्यांसाठीचे नियम असे आहेत.

हेही वाचा – ‘हे’ कारागृह दोन दिवस राहते सगळ्यांसाठी खुले, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात

१- कुठलाही अन्न व्यवसाय अथवा अन्नाचे वाटप करताना अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत विधी ग्राहय परवाना/नोंदणी प्रमाणपत्र घेण्यास आवश्यक आहे.

२- विनानोंदणी/विनापरवाना अन्न व्यवसाय / अन्नाचे वाटप केल्यास अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ कलम ३१ चा भंग होऊन कलम ६३ अन्वये दंड होऊ शकतो.

३- अन्न पदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवण्यात यावी.

४- शिळे अन्न पदार्थांची विक्री करू नये. तसेच शिळे अन्न पदार्थ त्वरीत नष्ट करावे.

५- अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य असावे

६- पिण्यास देण्यात येणारे पाणी निर्जंतुक करुन स्वच्छ भांड्यामध्ये साठवलेले व झाकलेले असावे.

७- अन्न पदार्थ तयार करण्यासाठी व वाढण्यासाठी वापरात येणारी भांडी ही वापरण्यापूर्वी व नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवावी

८- तयार अन्न पदार्थ झाकूण ठेवावेत.

९- प्रसाद / अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीने अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कपडे, अप्रॉन, हातमोजे, टोपी घातलेली असावी

१०- दूध व दुग्धजन्य पदार्थ हे गरम करुनच वापरावे व चांगले असल्याच्या खात्रीनंतरच सेवनास द्यावे.

११- खवा/ मावाची वाहतूक व साठवणूक मंड/ रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी.

१२- कच्च्या अन्न पदार्थाचे खरेदी देयक वेळोवेळी घेण्यात यावे.

१३- अन्न पदार्थ वितरण/ विक्रीच्या ठिकाणी कचरा साठविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.

हेही वाचा – यवतमाळ : ‘सोशल क्लब’च्या नावाखाली जुगार! कोट्यवधींची उलाढाल; थेट उच्च न्यायालयातून परवानगी?

१४- अन्न वाटपाचे ठिकाणी व परिसरात अधिकाधिक स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा.

१५. वृत्तपत्रामध्ये अन्नाचे वाटप करु नये, त्यातील लेखी मजकुरातील शाईमध्ये विषारी घटक असतात.

१६- खाद्यतेलाचा वारंवार अन्नापदार्थ तळण्यासाठी वापर करु नये, चांगल्या दर्जाचे खाद्यतेल वापरावे.

१७- नागरिकांनी/ ग्राहकांनी अन्न पदार्थ खरेदी करताना त्यावरील उत्पादन तारीख व बेस्ट बिफोर तारीख पाहूनच खरेदी करावी.

१८- अन्न पदार्थ खरेदी करताना काही चुकीचे/ आक्षेपार्ह आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन म. राज्य, नागपूर कार्यलयाच्या दुरध्वनी क्र. ०७१२- २६६२२०४ वर तक्रार नोंदवावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाचे सह आयुक्त कृ. रं. जयपूरकर यांनी केले.