नागपूर : नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झाले आहेत. शहरातील क्लब, कॅफे, रेस्टॉरंट यात नववर्षाच्या जल्लोषासाठी जोरात तयारी सुरू आहे. मात्र महागडे दर तसेच गर्दीचा गोंगाट यामुळे काहींनी यंदा ‘हाऊस पार्टी’चे नियोजन केले आहे. यासाठी ‘थीम’ आधारित तयारींना वेग आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नववर्षाचा उत्साह प्रत्येक वयोगटात असतो. गीत-संगीताच्या तालात आनंदाने कुटुंबासह नववर्षाचे स्वागत करण्याचा बेत आखला जातो. यासाठी शहरातील क्लब, कॅफे, रेस्टॉरंटमध्ये नेहमी गर्दी असते. मात्र गोंगाट तसेच अतिशय महागडे प्रवेश शुल्क यामुळे अनेकांनी पर्याय शोधणे सुरू आहे. नवा पर्याय म्हणून शहरात हाऊस पार्टीचे क्रेझ बघायला मिळत आहे. यामध्ये घरात किंवा छतावर सजावट करून कुटुंबीयांच्या साथीने नववर्षाचे स्वागत केले जाते. यात विविध संकल्पनांचा आधारही घेतला जातो. बोहेमन, डिस्को, सुपरहिरो, पॉप यासह विविध संकल्पना असतात. हाऊस पार्टीमध्ये घरच्या वरिष्ठांचा देखील समावेश असतो. घरगुती खाद्यपदार्थांचा बेत असतो.

हेही वाचा >>>अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

गृहसंकुलात सामूहिक जल्लोष

शहरातील फ्लॅट संस्कृतीमुळे कुटुंबाचा आकार लहान झाला आहे. यामुळे एका लहान कुटुंबाला हाऊस पार्टीचे आयोजन न परवडणारी बाब असते. यामुळे एका सोसायटीमध्ये किंवा एका परिसरात राहणाऱ्या विविध लहान कुटुंबीयांकडून सामूहिक हाऊस पार्टीचे आयोजन करण्याचा कल नागपूरमध्येही बघायला मिळत आहे. सोसायटीच्या प्रांगणात किंवा एखाद्या मोठ्या घरात अशा प्रकारच्या हाऊस पार्टीचे आयोजन केले जाणार आहे.