कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त आयोजित मॅरेथाॅनला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी, अधिकारी- कर्मचारी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन कुष्ठरोग निवारणाचा संदेश दिला.
हेही वाचा >>>नागपूर:पसंतीक्रमानुसार मतदानाला लागतो वेळ, केंद्रापुढे शिक्षकांच्या रांगा
फ्रीडम पार्क, संविधान चौक, आकाशवाणी चौक, विद्यापीठ चौक मार्गे मेट्रो स्टेशनपर्यंत मॅरेथॉन मार्ग होता.कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. मॅरेथॉनमध्ये सहभागी नागपूरकरांनी कृष्ठरोग जनजागृतीपर घोषणा दिल्या. १५ ते १८, १९ ते ३५ आणि ३६ वर्षांहून अधिक अशा तीन वयोगटात मॅरेथॉनची विभागणी होती. त्यात पुरुष व महिला असे गट होते. प्रथम विजेत्याला ३ हजार रुपये, व्दितीय २ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला १ हजार रुपये बक्षीस पाहूण्यांच्या हस्ते देण्यात आले.
हेही वाचा >>>नागपूर: मेळघाटात दुर्मिळ रानपिंगळ्याचे दर्शन; आठ नवीन प्रजातीची नोंद
प्रास्ताविक कुष्ठरोग आरोग्य सेवेच्या सहाय्यक संचालक डॉ. दीपिका साकोरे यांनी केले. यावेळी उपस्थितांना कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमात विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे म्हणाल्या, कुष्ठरोगासंदर्भात समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. रोग निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक आहे.