नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठ्याजवळ कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही. आरोपीचा सुगावा लागत नसल्यामुळे आरोपीची माहिती देणाऱ्यास ५ लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. गेल्या ४ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता यवतमाळवरून नागपुरात आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला जामठ्याजवळ एका आरोपीने अडविले. तिला कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा : जंगलाच्या रक्षणकर्तीचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान, “वनदुर्गा” सोहळा

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीच्या माहितीवरून आरोपी युवकाचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आले होते. मात्र, ‘स्मार्ट’ असलेल्या नागपूर पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही. सध्या वसुलीत मग्न असलेले गुन्हे शाखेची पथकेही कुचकामी ठरली आहेत. आरोपीचा शोध घेण्यात अपयश येताच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली. आऊटर रिंग रोडवरील ढाबे आणि हॉटेलमध्ये जाऊन वसुली करण्यासाठी चर्चेत असलेल्या हिंगणा पोलिसांनाही कोणताही सुगावा सापडला नाही.