शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार सोडल्यानंतर शहरातील २४ पोलीस ठाण्यात ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविल्याने ठाण्यात मनमानी कारभार सुरु होता. मात्र, नवे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी २० पोलीस ठाण्यात नव्या ठाणेदारांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा >>> वर्धा : राखीचे जीवन झाले सुखकर, डॉक्टरांनी दिले नवजीवन…
२० पैकी १७ ठाणेदार नागपुरात नव्याने रुजू झाले आहेत, हे विशेष. फेब्रुवारी महिन्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे राज्यातील दिडेशवर पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात नागपुरातील जवळपास ४७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे शहरातील जवळपास ८० टक्के पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरु होता. त्यामुळे काही पोलीस ठाण्यात मनमानी कारभार करण्यात येत होता. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने या अडचणीकडे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तातडीने २० पोलीस ठाण्यात ठाणेदारांची नियुक्ती केली. त्यात विनोद गोडबोले यांची नियुक्ती हिंगणा ठाण्यात तर विनायक कोळी यांची नियुक्ती धंतोली ठाण्यात करण्यात आली.
हेही वाचा >>>गडचिरोली : ‘मंगला’ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले, हत्ती स्थलांतराला गावकऱ्यां चा विरोध
रणजीत सिरसाठ (कोराडी), अजय आकरे (कपिलनगर), गजानन कल्याणकर (सायबर ठाणे), नरेंद्र हिवरे (वाहतूक शाखा-सोनेगाव), संतोस बाकल (वाहतूक शाखा-सिताबर्डी), संजय मेंढे (वाहतूक शाखा-कॉटन मार्केट) आणि भावन धुमाळ (वाहतूक शाखा- सक्करदरा) यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली. तसेच शहरात नव्याने रुजू झालेले नितीन मगर (सोनेगाव), रणजीत सावंत (प्रतापनगर), प्रवीण काळे (एमआयडीसी), राजेश तटकरे (वाडी), आसाराम चोरमले (सीताबर्डी), मनिष ठाकरे (सदर), राजश्री आडे (मानकापूर), संतोष पाटील (कोतवाली), अरविंद महर्षी (कोतवाली), अशोक भंडारे (अजनी), कैलास देशमाने (हुडकेश्वर), पोपट धायतोंडे (नंदनवन), विजय दिघे (वाठोडा) आणि राहुल आठवले यांची जरीपटका पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. युनूस मुलानी, अनिल कुरळकर आणि सुरेश वसेकर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.