नागपूर : देशातील वेगवेगळ्या भागात मागील काही दिवसांमध्ये विविध यंत्रणांना सातत्याने विमानांना बाॅम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळत आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांमध्ये भिती असून दुसरीकडे देशातील विविध सुरक्षा यंत्रणांचीही तारांबळ उडत आहे. दरम्यान नागपूर पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात या घटनेमागे गोंदिया कनेक्शन असल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.

जगदीश उईके (३५) असे गोंदिया येथील या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे. नागपूर पोलिस खात्यातील सूत्रानुसार, देशभरात विमानांना उडविण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी एका संशयित तरुणाची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. गोंदिया येथील ३५ वर्षीय जगदीश उईकेने हे कृत्य केल्याचा नागपूर पोलिसांना संशय आहे. आरोपी जगदीश उईके याला यापूर्वी २०११ मध्ये दहशतवादावरील एका लेखाच्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
police
प्रेमीयुगुलांकडून वसूली करणाऱ्या पोलिसांवरील गुन्हा रद्द, कारण काय? जाणून घ्या…
Washim Constituency, Washim BJP,
VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
Chota Matka a tiger from the Tadoba Andhari Tiger Project gave a glimpse to the tourists
ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”

हेही वाचा…बावनकुळेंच्या ताफ्यातील वाहने परस्परांवर आदळली, काय घडले ?

सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर पोलिसांच्या तपासात संशयित आरोपी जगदीश उईकेने बरेच ईमेल देशाचे पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री, विमानसेवा कार्यालये, पोलीस महासंचालक आणि रेल्वे सुरक्षा दलासह विविध सरकारी कार्यालयांना पाठवल्याचा संशय आहे. २१ ऑक्टोबर रोजी उईके यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या पद्धतीचे धमकी देणारे ईमेल पाठवले होते. त्यानंतर देशातील काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

उईके यांनी दिलेल्या इतरही वेगवेगळ्या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा वाढवली आहे. उईके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ‘गुप्त दहशतवादी संहिता’ वर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. नागपुरातील पोलीस विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, हा ईमेल पाठविण्याचा संशयित आरोपी जगदीश उईके सध्या फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकाकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

हेही वाचा…खुशी के आंसू! उमेदवारी मिळताच आमदारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…

प्रकरण काय?

सव्वीस ऑक्टोबरपर्यंतच्या काळात १३ दिवसांच्या कालावधीत, भारतातील तीनशेहून अधिक विमानांना बॉम्बने उडविण्याचा धमक्या मिळाल्या होत्या. मुख्यतः सोशल मीडियाद्वारे या धमक्या दिल्या गेल्या. एकट्या २२ ऑक्टोबर रोजी विमान उडवण्याच्या देण्यात आलेल्या धमक्यांमुळे देशातील सुमारे ५० उड्डाणे प्रभावित झाली होती.

या धमक्यांचा इंडिगो आणि एअर इंडियासारख्या विमान कंपन्यांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे प्रवाश्यांनाही प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला होता. तर सुरक्षा यंत्रणांचीही तारांबळ उडाली होती.