नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने मानकापूर परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर छापा घालून ४ सट्टेबाजांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २३ मोबाईल फोनसह ५.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरहान अली लियाकत अली (२८) रा. गवलीपुरा, गांधीबाग, शोएब अली शाकिब अली सय्यद (३८) रा. जाफरनगर, इमरान अली जहीर अली (४२) रा. सतरंजीपुरा आणि इरशाद रफिक कुरेशी (३६) रा. मोतिलालनगर, दिघोरी, अशी आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कार्तिकनगरच्या बोधड लेआऊट येथील एका घरात सट्टेबाजांची टोळी क्रिकेट सट्ट्याचा जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि छापा घातला. आरोपी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान सुरू असलेल्या टी-२० सामन्यावर जुगार खेळताना करताना आढळले.

हेही वाचा…बारामतीनंतर सुनील केदारांचा पुण्यात तळ, म्हणाले ” पुणेकरांनी…”

पोलिसांनी आरोपींकडून २३ मोबाईल, २ टॅब, २ लॅपटॉप आणि ३ दुचाकी वाहन असा एकूण ५.७१ लाख रुपयांचा माल जप्त केला. चारही आरोपींविरुद्ध मानकापूर ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.