नागपूर: पोलीस दलात निवड झालेल्या महिला पोलिसांचे नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यांना शुक्रवारी झालेल्या दीक्षांत समारंभात प्रमाणपत्र देण्यात आले. एकूण १२०० महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना आता काही दिवसांनी कामावर रुजू व्हावे लागणार आहे. प्रशिक्षण केंद्रात आयोजित दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक दुर्गम भागातील होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले होते. सर्वांना आपल्या मुलीला पोलीस पोशाखात रुबाबात परेड करताना बघायचे होते. ते बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आपण केलेल्या कष्टाचे उत्तम फळ आले याचा त्यांना अभिमान होता. या सोबतच राज्याच्या गृहमंत्र्यांप्रतीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘थॅंक्यू फडणवीस’अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक ११२ चे दीक्षांत संचालन सकाळी ८ वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर पार पडले. विशेष पोलीस महानिरीक्षक ( प्रशिक्षण व खास पथके) प्रवीणकुमार पडवळ उपस्थित होते. त्यांनी परेड निरीक्षण केले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थींचे पालक, आप्त स्वकीय उपस्थित होते.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’

हे ही वाचा…वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा

परडे संचलन झाल्यावर सर्व पालकांनी त्यांच्या प्रशिक्षणार्थी मुलींची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अ्श्रू आले होते. आलेल्या पालकांमध्ये बहुतांश मध्यमवर्गीय, गरीब , दुर्गम भागातील होते. त्यांनी पोटाला चिमटा घालून मुलींना शिकवले होते. मुलींनीही त्यांच्या कष्टाचे चिज केले. त्यांची पोलीस दलात निवड झाली. त्यांना पोशाखात पाहिल्याव र पालकांना समाधान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून अत्यंत छोटशा गावातून आलेले सूर्यवंशी म्हणाले. “ आम्ही मुलीला शिकवण्यासाठी कष्ट केले. त्याचे तिने चिज केले. पोलीस दलात ती रुजू होणार आहे. काय बोलावे कळत नाही, मुलीला ही संधी मिळवून दिल्याबद्दल फडणवीस साहेबांचे आभार”एक पालक यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून आले होते. त्यांच्या मुलीने पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्याचेहऱ्यावर याचे समाधान होते. राज्य शासनाच्या महिलांसाठीपोषक धोरणामुळेच मुलीला ही संधी मिळाली असे पालकांनी सांगितले. सोलापूरहून आलेले पालक म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा आम्हाला लाभ मिळाला. फडवणवीस यांच्यामुळेच मुलींचे प्रशिक्षण पूर्ण झाले. याचे समाधान आहे.काही पालकांनी दीक्षात संचालन कार्यक्रम आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी महिलांनी त्यांना दिलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले