नागपूर: पोलीस दलात निवड झालेल्या महिला पोलिसांचे नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यांना शुक्रवारी झालेल्या दीक्षांत समारंभात प्रमाणपत्र देण्यात आले. एकूण १२०० महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना आता काही दिवसांनी कामावर रुजू व्हावे लागणार आहे. प्रशिक्षण केंद्रात आयोजित दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक दुर्गम भागातील होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले होते. सर्वांना आपल्या मुलीला पोलीस पोशाखात रुबाबात परेड करताना बघायचे होते. ते बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आपण केलेल्या कष्टाचे उत्तम फळ आले याचा त्यांना अभिमान होता. या सोबतच राज्याच्या गृहमंत्र्यांप्रतीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘थॅंक्यू फडणवीस’अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा